breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आत्मनिर्भर भारत पथविक्रेता योजना अंतर्गत भाजयुमो तर्फे अर्ज भरण्यास सुरूवात

– तब्बल १८० पथविक्रेतानां आत्मनिर्भर निधी साठी सहभाग

पिंपरी | प्रतिनिधी
आत्मनिर्भर भारत टिम व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भोसरी येथे पथविक्रेत्यांना १० हजार रूपयांच्या निधीसाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नागर वस्ती विकास योजना विभाग द्वारा प्रधानमंत्री पथविक्रेता(फेरीवाले) आत्मनिर्भर निधी अंतर्गत है उपक्रम राबविला जात आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप व नगरसेविका सोनाली दत्तात्रय गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली याची सुरुवात झाली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजयुमो शहराध्यक्ष श्री संकेत चोंधे, सरचिटणीस नगरसेवक दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, भोसरी चर्होली मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आले.

तसेच आत्मनिर्भर भारत संयोजक विक्रांत गंगावणे, सहसंयोजक प्रियांका शाह सिंह, पूजा अल्हाट, दिपक घण, दत्ता वाळके, निगडी चिखली मंडल उपाध्यक्ष ऋषीकेश भालेकर, अनुसुचित जाती संयोजक सचिन उदागे, विद्यार्थी उपाध्यक्ष अनिकेत शेलार, तेजस मुळे हे उपस्थित होते.

या वेळी भाजी मंडई शेजारी, भोसरी गावठाण येथे आत्मनिर्भर भारत टिम व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे स्टाॅल लावण्यात आले.

कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची पिंपरी चिंचवड शहरात अंमल बजावणी करण्यात येत आहे. १ व २ फेब्रुवारी २०२१ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंडई शेजारी, भोसरी गावठाण या ठिकाणी हे अर्ज भरून देण्यात येतील, अशी माहिती भाजप युवा मोर्च्यातर्फे सांगण्यात आले. तरी प्रभागातील सर्व नागरीकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रकाश चौधरी यांनी केले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button