आज दुपारचा आणि सायंकाळचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून आज मंगळवारी (दि. 22) दुपारी आणि सायंकाळी होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे आवाहन केले आहे.
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राला विदयुत पुरवठा करणा-या “MSEDCL च्या मीटरिंग किऑस्कमद्धे” बिघाड झाला आहे. रावेत येथील संपूर्ण पंपिंग बंद पडले आहे. यामुळे पूर्ण शहराचा दुपारपासूनचा तसेच सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
उद्या सकाळचाही पाणी पुरवठा विस्कळीत राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. MSEDCL मार्फत समन्वयाने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. MSEDCL मार्फत दुरुस्ती झाल्यावर लवकरात लवकर पंपिंग चालू करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.