breaking-newsपिंपरी / चिंचवड

आंबेडकर आणि फुले जयंतीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमावर होणारा लाखो रुपयांचा अनाठायी खर्च टाळून दोन्ही महापुरूषांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात रयत विचार मंचच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ एप्रिल ते १५ एप्रिल कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सांस्कृतिक जयंती मोहत्सव भरविला जातो. जयंती मोहत्सवाला लाखो रुपये खर्च केले जातात. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाते. ती करायलाच पाहिजे.

जयंती मोहत्सव कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळण्यात यावा. क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करण्यात यावी. सांस्कृतीक महोत्सवाचा संपूर्ण खर्च शिष्यवृत्तीवर खर्च करावा.

दरवर्षी उच्चशिक्षण घेणाऱ्या जातीत जास्त १० व कमीत कमी ५ विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती देण्यात यावी. हीच खरी दोन्ही महापुरूषांना आदरांजली ठरेल, असे रयत विचार मंचचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button