अ प्रभागात अधिकारी, कर्मचा-यांनी घेतली सद्भावना प्रतिज्ञा
पिंपरी – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिधी व दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचा-यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामूहिक ‘सद्भावना प्रतिज्ञा घेतली.
निगडी प्राधिकरणातील अ प्रभाग कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक आयुक्त व प्रभाग अधिकारी मंगेश चितळे, आरोग्य अधिकारी एम. एम, शिंदे, श्री. लटपटे यांच्यासह सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी हजर होते. अनुराधा गोरखे यांनी सामूहिक जबाबदारी म्हणून काम करत असताना सर्वांनी माणुसकी जपायला हवी. धर्म, जातीसारखे भेदभाव दूर करायला हवेत. आपल्यामुळे देशाचे, राज्याचे किंवा आपल्या शहराचे कसलेही नुकसान होणार नाही. याची खबरदारी सर्वांनी घेतल्यास दहशतवाद, हिंसाचार समाजातून नाहिसा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.