अवैध नळजोडांवर तातडीने कारवाई करा – महापाैर राहूल जाधव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/MG_0740.jpg)
- ग प्रभागातील विविध अडीअडचणी आणि विकास कामांचा घेतला आढावा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – अवैधपणे घेतलेल्या नळजोडांवर आणि विद्यूत मोटारीने पाणी खेचणा-या नागरिकांवर तातडीने कारवाई करावी, अशा सक्त सूचना ग प्रभागाच्या बैठकीत महापौर राहूल जाधव आणि नगरसेवकांनी अधिका-यांना दिल्या.
महापौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग प्रभागात सोमवारी (दि.22) झालेल्या या बैठकीला प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसेवक मनिषा पवार, सविता खुळे, सुनिता तापकीर, संदिप वाघिरे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, निलेश बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य संदीप गाडे, गोपाल माळेकर, विनोद तापकीर आदी उपस्थीत होते.
प्रामुख्याने पाण्यावरून नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या. त्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी बिगर परवाना नळ कनेक्शनववर कारवाई करा, पाणी पुरवठा पाईप लाइन चुकीच्या टाकणा-या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा, मोटारी लावुन पाणी घेणा-यांवर कारवाई करणे आणि जुन्या पाण्याच्या पाईप लाइन काढुन नवीन पाईप लाइन टाकण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तर, मच्छर, डुक्करे, भटकी कुत्रे, रस्तावरील गुरे यांच्या त्रासापासुन नागरिकांना वाचवा, असा सल्लाही महापौर व नगरसेवकांनी दिला.