पिंपरी / चिंचवड
अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये योगसाधना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180621-WA0003-1.jpg)
पिंपरी – प्राधिकरण मोशी येथील अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
शाळेत 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यासाठी योग विद्याधामच्या वतीने विशेष योग प्राविण्य असलेल्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके सादर करून दाखविली. त्यामध्ये मानसिक तणाव, स्नायुंचा स्थुलपणा, एकाग्रतेची प्रगती अशा प्रकारची आसने विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यामध्ये शिक्षकांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सियोना यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचा उगम आणि त्याचे महत्व पटवून सांगितले.