अपर्णा जोशी यांना जिल्हास्तरीय लघुउद्योजक पुरस्काराने सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG_64.jpg)
- उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रदान
पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंबळी, पुणे येथील स्वामी समर्थ पॉलिफिल्म इंंडस्ट्रीज लिमिटेड पॅकेजिंग कंपनीच्या संचालिका अपर्णा जोशी यांना पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे,उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे,उद्योग विभागाचे सचिव सतीश गवई, संचालिका दिपाली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्पादनक्षमता, कामगार कल्याण, गुणवत्ता, ग्राहक संतोष व वार्षिक उलाढाल अशा विविध बाबींचा विचार करून हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अपर्णा जोशी यांना यापूर्वी मुंबई येथील उद्योगश्री संस्थेतर्फे उद्योगश्री विशेष गौरव पुरस्कार व जनशक्ती फाउंडेशन पुणे तर्फे पुरस्कार देण्यात आले आहेत. ही कंपनी उद्योगांना प्लॅस्टिक पँकेजिंग बॅग्स व कव्हर्स पुरविते.
अपर्णा जोशी यावेळी म्हणाल्या की, गुणवत्ता, वेळेवर मालाचा पुरवठा, किफायतशीर किंमती जिद्द, कष्ट व सतत नाविन्याची ओढ या बळावरच हे यश मिळविले. हा पुरस्कार म्हणजे चिकाटी,प्रयत्न व आत्मविश्वास याला मिळालेला सन्मान आहे.महिलांना उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांनी उद्योगात आपले यश मिळवावे.या पुरस्काराबद्दल उद्योग जगतात अभिनंदन होत आहे.