अपंग भवनाची अधिकारी व प्रहार संघटनेकडून पाहणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201017-WA0011.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभाग दिव्यांग कल्याणकारी योजना अंतर्गत मोरवाडी पिंपरी येथे तयार होत असलेल्या चार मजली अपंग भवनाची महानगरपालिका अधिकारी व प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे पदाधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली.
या पाहणी दरम्यान संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी अपंग भवनाच्या चालू कामामध्ये काही बदल सुचवले आहेत. या ठिकाणी सेंसरी गार्डन आवश्यक आहे, सर्व प्रकारच्या थेरपी उपलब्ध कराव्यात, दोन गेस्ट रुम ( एक महिला एक पुरुष)स्वतंत्र कँटीन, अँटोटेरीयममध्ये चेंजीग रुम, स्विमिंग पुल, अग्रीकर्चल थेरपी, या व अशा सूचना केल्या आहेत.
यावेळी महापालिके समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, उपअभियंता चौरै, अर्किटेट साळवी, प्रहारचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी काळभोर आदी उपस्थित होते.