breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या स्थानिक गटबाजीवरून शहराध्यक्ष निशब्द

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपअंतर्गत गटतट निर्माण झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसत आहे. आपलेच पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत असल्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. याबाबत विचारले असता पदाधिका-यांच्या चुका दुरूस्त केल्या जातात. परंतु, त्या दुर्लक्षीत केल्या जात नाहीत, असे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. परंतु, सुधारणा केलेल्या चुकांबाबत मात्र, जगताप निशब्द झाले. यावरून स्थानिक पदाधिका-यांवरील त्यांचाही कंट्रोल निसटतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेतील प्रशासन असो अथवा पक्षाचे पदाधिकारी त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कोणी कोणालाच विचारत नसल्यामुळे पारदर्शकतेचा नारा देणा-या भाजपचा प्रोटोकॉल पक्षाच्याच पदाधिका-यांकडून पायदळी तुडविला जात आहे. महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता यांच्या कारभारात कोणीच हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नाही. तर, पक्षाचे अन्य पदाधिकारी मात्र, पालिकेत ठाण मांडून कामकाजात हस्तक्षेप करत असतात. त्यामुळे पक्षात उभी फुट पडली आहे. अंतर्गत नाराजी उद्भवल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. यावर शहराध्यक्ष या नात्याने आमदार जगताप यांची पकड ढिली होत चालल्याचे दिसते, अशी चर्चा पदाधिकारी करीत आहेत.

पक्षांतर्गत वादामुळेच भाजपचे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. तर, पालिकेच्या कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेवर पदाधिका-यांची नावे छापण्याचा प्रोटोकॉल प्रशासनाकडून धाब्यावर बसविला जातो. तर, काही पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमाला व्यक्तीद्वेशापोटी अनुपस्थित राहतात. आज सोमवारी (दि. 21) पक्षाच्या पत्रकार परिषदेत देखील मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भाजपची आगामी वाटचाल बिकट असल्याचे मत राजकीय जाणकारांनी वर्तविले आहे.

यावरून भाजपअंतर्गत परिस्थितीबाबत विचारले असता शहराध्यक्ष या नात्याने आमदार जगताप यांनी पदाधिका-यांच्या चुका दुरूस्त केल्या जातात. परंतु, त्या दुर्लक्षित केल्या जात नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, दुरूस्त केलेल्या चुकांबाबत विचारले असता आमदार जगताप निशब्द झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button