breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अनाथ मुलांसाठी आमदार महेश लांडगे यांचे ‘प्रेरणा’दायी कार्य!

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्त
  • आमदार कन्या साक्षी लांडगे हिचा ‘बेटी बचाओ’चा संदेश

पिंपरी । प्रतिनिधी ।

वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून आमदार महेश लांडगे यांनी अनाथ मुलांसाठी काम करणा-या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच, आमदार कन्या साक्षी लांडगे हिने ‘बेटी बचाओ’चा संदेश देवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस (दि.२२ जुलै) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ‘माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार लांडगे यांचे चिरंजीव मल्हार लांडगे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या चारा छावणीला भेट दिली.  तेथील गुरांना मोफत चारा वाटप करण्यात आले.

दरम्यान, आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी लांडगे यांनी अनाथ मुलांसाठ काम करणा-या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली.  पुणे जिल्ह्यात सुमारे २८ वर्षांपासून ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करीत आहे. आधार ॲडॉपशन सेंटरच्या संस्थापक माधवी भिडे यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपवण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध वैद्य खडीवाले यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.

****

सोशल मीडियातून भेटली लढायला शिकवणारी ‘प्रेरणा’

शहरातील राजकीय क्षेत्रात सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करणारा नेता म्हणून आमदार लांडगे यांची ओळख आहे. मात्र, त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्य आदर्शवत उभारण्याचे भूमिकाही लांडगे आणि त्यांच्या सहका-यांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्‍हायरल झाली आहे. त्यामध्ये १५ ते २० दिवसांपासून एक अनाथ बाळ चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असल्याचे म्हटले होते. अत्यंत दुर्मिळ असलेला carnitine deficiency हा आजार संबंधित मुलीला झाला आहे. अवघ्या २ ते ३ किलो वजनाच्या या बाळाला सलाईन टोचावी लागते. मुलीच्या उपचारासाठी दिवसाला सरासरी १० हजार रुपये खर्च होतात. संबंधित मुलीला डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृत्यूशी झुंज देणा-या या मुलीला ‘प्रेरणा’ म्हणून ओळखले जात आहे. आमदार महेश लांडगे संध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती आणि कन्या साक्षी यांनी पुढाकार घेवून ‘प्रेरणा’ हिला तातडीची  एक लाख रुपयांची मदत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या संस्थेला मदत करुन आदर्श निर्माण केला आहे.

****

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल प्रशासनाचे सामाजिक कार्य…

संस्थेच्या वतीने ‘प्रेरणा’ हिला उपचारासाठी समाजबांधवांनी मदत करावी असे आवाहन सोशल मीडियातून करण्यात आले होते. याची दखल घेत आमदार लांडगे यांच्या सहका-यांनी तात्काळ संस्थेची माहिती मिळवली. आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी लांडगे यांनी संबंधित मुलीला हॉस्पिटलमध्ये भेट दिली. तिच्यासाठी काम करणारी ‘आधार’ ही संस्था विनाअनुदानीत असल्याने अनेक अडचणी आहेत. त्यामुळे संस्थेला आर्थिक मदत करण्याचे निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे,   डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल प्रशासनाने ‘आधार’ संस्थेकडून येणा-या मुलांना उपचारामध्ये सर्वोतोपरी मदत करावी, असे साकडे घातले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हॉस्पिटल प्रशासनानेही ‘आधार’मधील मुलांना मदत करण्याचे आश्वासन दिले. आमदार लांडगे आणि त्यांच्या सहका-यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुन्हा एकदा आदर्श कार्य उभा केले. याबाबत हॉस्पिटल प्रशासन आणि संस्थेच्या पदाधिका-यांनी कौतूक केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button