breaking-newsपिंपरी / चिंचवड

अनधिकृत बांधकामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

  • राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचा पुढाकार
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केली चर्चा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे आणि अशा बांधकामांना आकारला जाणारा शास्ती कर यातून नागरिकांची सुटका करण्याचा कायदेशीर मार्ग राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी काल गुरूवारी (दि. 9) पत्रकार परिषद घेऊन सांगितला. यासंदर्भात त्यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढच्या आढवड्यात पवार खास पिंपरी-चिंचवड शहरासाठी वेळ काढणार आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यावेळी शहरतील अनिकृत बांधकामे आणि त्यावर आकारला जाणारा शास्ती कर यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे, असे कस्पटे यांनी सांगितले.

कस्पटे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्ती कर माफ झाला तरी बांधकामे कशी अधिकृत होणार नाहीत. याचा कायदेशीर उलघडा करून सांगितला. शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्यातील अन्य महापालिकांनी केलेली अंमलबजावनी याचा सारासार विचार केल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे कशी अधिकृत होऊ शकतो, हे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button