अधिका-यांच्या बढतीत तोडपाणी करणा-यांनी आम्हाला शिकवू नये – पक्षनेते एकनाथ पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Kadam-11.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अनुभवी व कार्यक्षम अधिकारी अधिकारी राजन पाटील यांना शहर अभियंतापदी पदोन्नती देण्याचा विषय उपसूचनेद्वारे मंजुर केला. त्यावरून आरोप करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यांच्या सत्ताकाळातील अर्थकारणाचा दांडगा अनुभव आहे. तत्कालीन राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अधिका-यांच्या बढतीत तोडपाणी करणा-यांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये, असे प्रत्युत्तर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे.
स्वच्छ भारत अभियानातील घरगुती वैयक्तिक शौचालयाच्या विषयाला पदोन्नतीची उपसूचना विसंगत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल यांनी गुरूवारी (दि.20) झालेल्या पालिका सभेत वाद घालत सभात्याग केला.
पदोन्नतीसाठी भाजप पदाधिकार्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावकून पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कदम व बहल यांचे पालिका सत्ताकाळातील जीवन अर्थकारणात गेले आहे. त्यांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये. कर्मचारी महासंघाने शासनाने प्रतिनियुक्तीवर नेमलेला अधिकारी नियुक्त करण्यापेक्षा राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची मागणी केली आहे. तसेच, पालिकेने त्यांच्याकडे सदर पदाचा कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. त्याच चुकीचे काय आहे, असा सवाल त्यांनी केला.
उपसूचना सुसंगत आहे किंवा नाही, हे ठरविणे प्रशासनाचे काम आहे. विसंगत उपसूचना फेटाळण्याचा अधिकारी पालिका नियमात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण किती अनुभवी व स्मार्ट आहे हे दाखविण्यासाठी ते सभागृहात बेताल वक्तव्य करतात. त्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे. अन्था खालची पातळी गाठून उत्तरे आम्हालाही देता येतात, असे पवार म्हणाले.