अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची बदली करा, नगरविकास विभागाकडे तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/66.jpg)
मोरवाडी आयटीआय काॅलेज मशिनरी खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी आयटीआय काॅलेजमधील मशिनरी खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सदरील निविदा जादा दराने काढण्यात आलेल्या आहे. त्या निविदा संबंधित ठेकेदार आणि अतिरिक्त आयुक्तांच्या संगणमताने काढून गैरकारभार केला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची तातडीने बदली करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहूल कोल्हटकर यांनी केली. याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
कोल्हटकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील हे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडे विविध पदभार सोपविण्यात आला आहे. त्यात शिक्षण विभागही दिला आहे. त्यांच्याकडील असलेल्या विभागातील कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार सुरु आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होवू लागले आहे.
मोरवाडी येथील आयटीआय काॅलेजमधील विविध मशिनरी खरेदी करण्यात आलेली आहे. त्या मशिनरी खरेदीसाठी निविदा प्रसिध्द करण्यात आल्या. त्या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. सदर निविदा रक्कम ही बाजार भावाच्या तुलनेत 640 पट जादा आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व ठेकेदार यांनी मिळून मोठ्या प्रमाणात गैरकारभार करु लागले आहेत.
पाटील हे अरिक्त आयुक्त पदी नियुक्त झाल्यानंतर महापालिकेचे आर्थिक नुकसान होवू लागले आहे. भ्रष्टाचाराला ते खतपाणी घालू लागले आहेत. सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभाराचा नारा दिला होता. परंतू, अशा अधिका-यामुळे खराब शैक्षणित साहित्य खरेदी केल्याने चांगल्या दर्जेची मशिनरी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अधिका-यांची तात्काळ दखल घेवून, यापुढे अशा पध्दतीने गंभीर कृत्य करु नये याकरिता अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची तातडीने इतरत्र बदली करण्यात यावी, अशीही मागणी कोल्हटकर यांनी केली आहे.