breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णासाहेब मगर स्टेडिअमवरील कोविड सेंटर उभारणीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअमवर उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत.

णे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये ऑक्सीजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या एक हजार बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रितपणे रुग्णालय उभारत आहे. हे रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत तयार होईल, अशी माहिती पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाढीचा आलेख उंचावतच आहे. भविष्यातील रुग्णवाढीचा अंदाज घेऊन राज्य सरकार, दोनही पालिका, जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए जम्बो सुविधांची निर्मिती करत आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कोविड सेंटरला भेट देवून पाहणी करणार आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री शहरात दाखल होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button