breaking-newsपिंपरी / चिंचवड

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे आकुर्डी येथील भीक मागणारा व्यक्ती गंभीर जखमी

पिंपरी : आकुर्डी चौकात भीक मागत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये भीक मागणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 18 जून रोजी दुपारी घडली. याबाबत 23 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारशी खात्रीबाद भोसले (वय 45, रा. पारधी आळी, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीचा भाऊ मॅनेजर खात्रीबाद भोसले (वय 55) हा 18 जून रोजी आकुर्डी चौकात भीक मागत होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये मॅनेजरच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आरोपी वाहन चालक न थांबता निघून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button