breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अंदर मावळात खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिवसेना शाखांचे उद्घाटन
पिंपरी / महाईन्यूज
मावळ तालुक्यातील अंदर मावळ भागातील भोयरे, कुणे, निसाळवाडी, खांडी, बोरिवली, शिंदे घाटावाडी शिवसेना शाखांचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख बाळा कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, राजेश पळसकर, गणेश जाधव, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शरद हुलावळे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.