breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन हॅक, ॲपलकडून इशारा

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन केंद्र सरकार हॅक करण्याचा प्रयत्नात असल्याचा इशारा अॅपल कंपनीकडून देण्यात आला आहे. यामध्ये महुआ मोईत्रा, शशी थरूर, प्रियांका चतुर्वेदी या नेत्यांचा समावेश आहे.

कदाचित राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय बोलणं झालं? मनोज जरांगे पाटील म्हणाले..

महुआ मोईत्रांनी अशा प्रकारचे संदेश आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची यादी एक्सवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांच्याव्यतिरिक्त अखिलेश यादव, राघव चड्ढा, शशी थरूर, प्रियांका चतुर्वेदी, सीताराम येचुरी, पवन खेरा व राहुल गांधींच्या कार्यालयातील इतर नेत्यांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा सगळा प्रकार आणीबाणीपेक्षाही वाईट आहे, असं मोईत्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button