breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तिकीट मिळताच पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना सूचक इशारा

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकमेकांसमोर कसे निवडणूक लढवतील? अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे आपल्याला कदाचित लोकसभेची संधी देण्यात आल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी आज खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत साथ दिली तर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना साथ द्याल का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला. “जसं ते माझं लोकसभा निवडणुकीत काम करतील, तसंच मी त्यांचं काम करेन”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

“धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष यांची राज्यात युती आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या आम्ही जिल्ह्यात एक आहोत. आमच्या युतीनंतर जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान नक्कीच मिळेल”, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रकरणी कोविंद समितीचा अहवाल राष्ट्रपती यांना सादर

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे भाऊ-बहीण असले तरी त्यांच्यातला राजकीय वाद हा सर्वश्रूत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून नेहमी एकमेकांवर टीका करण्यात आली आहे. पण अजित पवार गट भाजपच्यासोबत आल्याने या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाचं रुपांतर मैत्रीत झालं आहे. पण हे दोन्ही नेते मनापासून एकत्र आले आहेत का? ते आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे. धनंजय मुंडे खरंच पंकजा जिंकून याव्यात यासाठी प्रचार करतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

“भाजप आणि अजित पवार गटाची युती झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत जास्त मतांनी जिंकून येऊ, अशी अपेक्षा आहे. कारण जास्त ताकद वाढेल ना? आम्ही जिल्ह्याची निवडणूक लढलो तेव्हा परिस्थिती वेगळी होती. विधानसभेत एकमेकांसमोर लढलो कारण तिथली परिस्थिती वेगळी आहे. धनंजय मुंडे यांचं सोबत येण्यानंतर परळी विधानसभेत आम्हाला जास्त त्रास होणार नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button