breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून उभी करेन’; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

पुणे | बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना कोणती जबाबदारी देण्यात येणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते.

हेही वाचा    –      शेतकऱ्यांची चिंता वाढली! कुठे कडक उष्णता तर कुठे पावसाचा इशारा

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांना मी नाशिकमधून उभे करेल असे म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button