ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

नितीन गडकरी यांचा नागपुरात मोठा विजय

काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा १ लाख १० हजार मतांनी पराभव

नागपूर : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागपूर मतदारसंघातून भाजपच्या नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पराभूत करत तिसऱ्यांदा खासदारकी मिळवली आहे. नितीन गडकरी हे सुरुवातीपासूनच लीडवर होते. त्यांनी १ लाख १० हजार मतांनी विजय मिळवला आहे.

नागपूर हा भाजपचा गड राहिलेला आहे. येथून यंदाच्या निवडणुकीत मंत्री नितीन गडकरींना भाजपने रिंगणात उतरवलं होतं. तर त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना मैदानात उतरवण्यात आले. गडकरी यांच्याकडे मंत्रीपदाचा दांडगा अनुभव आहे. त्यांना गेल्या पाच वर्षात देशातच नाही तर नागपुरातही रस्ते बांधकामात मोठं काम केलं आहे. तर, दुसरीकडे विकास ठाकरे आहेत, ज्यांचं नागपुरातील नेटवर्क खूप मोठं आहे. त्यामुळे यंदा नागपुरातून निवडणुकीत तगडे नेते देण्यात आले होते. आता नागपुरांनी कोणाला कौल दिला आहे हे काहीच तासात कळणार आहे.

सहाव्या राउंडमध्ये गडकरी यांची लीड साडेतीन हजारांनी कमी झाली, पाचव्या राउंडमध्ये लीड ४७ हजार ३९७ होती
नागपूरात सहाव्या फेरी नंतर नितीन गडकरी 43958 मतांनी आघाडीवर
पाच राउंडमध्ये नितीन गडकरी यांना ४८ हजारांपेक्षा अधिकची लीड, आणखी १५ राउंड बाकी, लीड दोन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज भाजपचे पदाधिकारी वर्तवत आहेत
नितीन गडकरी ४०,१५० मतांनी आघाडीवर
तिसऱ्या फेरीअखेर नितिन गडकरी ३२ हजार ५८० मतांनी आघाडीवर
विकास ठाकरे ८४ हजार २० मतं मिळाली
नितिन गडकरी नितीन गडकरी यांना मिळालेली मते १ लाख १६ हजार ६००
नागपुरातून नितीन गडकरी १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत
नागपुरातील लोकसभा निवडणुकांच्या निकाल येण्यास सुरुवात झाली आहे, नागपुरातून पोस्टल बॅलेटमध्ये भाजपचे नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत.

देशव्यापी कर्तृत्वामुळे मोठा आत्मविश्वास कमावलेले नितीन गडकरी आणि ‘गमावण्यासारखे काहीच नाही’ असे सांगत गल्लोगल्ली कामाला लागलेले विकास ठाकरे अशांमधील दुहेरी लढत नागपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी बघायला मिळाली. तर नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी बसपाकडून योगेश लांजेवार हे रिंगणात उतरले. यंदा नागपुरातून वंचितने कुठलाही उमेदवार न दिल्याने लांजेवार यांनी संधी साधली. त्यांना विश्वास होता की दलित समाजाची मतं त्यांच्या पारड्यात जातील.

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा व महापालिका निवडणुकांमुळे केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते मंडळी पूर्ण शक्तिनिशी कामाला लागल्याचं प्रचारातून दिसून आलं. गडकरी यांच्या प्रचारासाठी केवळ पक्ष पदाधिकारी, नेते व कार्यकर्तेच नाहीत तर ‘परिवारा’सह इतर घटकांनीही मोठा प्रचार केला होता. नियोजनबद्ध आखणी, प्रत्यक्ष पदयात्रा व सभा तसेच लहान बैठकांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचले.

नागपूर लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

पक्ष उमेदवार कोणाचा विजय कोण पराभूत?
भाजप नितीन गडकरी विजयी
काँग्रेस विकास ठाकरे पराभूत
बसपा योगेश लांजेवार पराभूत
विकास ठाकरे यांचं नागपुरातील नेटवर्क मोठं असल्याने ही निवडणूक तशी अटीतटीची होती. त्यात एरवी काँग्रेसमध्ये न दिसणारे गठ्ठा कार्यकर्तेही त्यांना लाभले. निवडणुकीआधी बेफिकीर असलेले विकास ठाकरे प्रचारासाठी गंभीर दिसले.

नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील चप्पा चप्पा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढला होता. चार भाजप व दोन काँग्रेस असे विधानसभेचे स्वामित्व असल्याने जनतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केलं. भाजप व काँग्रेसने मतांचा जोगवा मागण्यासाठी अनुक्रमे ‘लोकसंवाद’व ‘जनआशीर्वाद’ यात्रा काढल्या.

नितीन गडकरी यांच्या प्रचाराची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बड्या नेत्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतली होती. नितीन गडकरी यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. पंतप्रधानांची सभा रामटेक मतदारसंघात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट प्रचाररथातून उतरून दुचाकीवर स्वार झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. गडकरी यांच्यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून प्रवीण दटके, शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासोबत डॉ. उपेंद्र कोठेकर, संजय भेंडे, अनिल सोले तसेच, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, धर्मपाल मेश्राम, संदीप गवई यांनी आपआपल्या मतदारसंघासह प्रचार व नियोजन केले होते.

विकास ठाकरे यांच्यासाठी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभा व यात्रा गाजवल्या. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद यांनी प्रचार केला. मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत यांच्या दिलजमाईने गटबाजीला ब्रेक लावले. या नेत्यांसोबत प्रफुल्ल गुडधे, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, नितीन कुंभलकर, संदेश सिंगलकर, संजय दुबे, संदेश सिंगलकर, उमाकांत अग्निहोत्री, कमलेश समर्थ, कुणाल राऊत, बंटी शेळके असे दुसऱ्या फळीतील नेते आघाडीवर होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button