breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही कारण..’; निर्मला सीतारमण

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्तावाला नकार दिला आहे. लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली होती. मला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा पर्याय देखील देण्यात आला होता. यासाठी मी एक आठवडा किंवा १० दिवस विचार केला. त्यानंतर मी निवडणूक लढवण्यासाठी एवढा पैसा नाही.

हेही वाचा      –     नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश, बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण?

देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसे का नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, भारताचा एकत्रित निधी (अर्थखात्याचा निधी) हा माझा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे. भारताचा एकत्रित निधी माझा नाही, असं निर्माला सीतारमण म्हणाल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती किती?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती खूप कमी आहे. सीतारामन यांच्याकडे सुमारे १.३४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सीतारामन आणि त्यांच्या पतीच्या नावावर असलेल्या घराची किमंत ९९.३६ लाख रुपये असून, याशिवाय त्यांच्याकडे सुमारे १६.२ लाख रुपयांची बिगर शेती जमीन सुद्धा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मासिक वेतन सुमारे ४ लाख रुपये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button