breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘लोकसभा तो सिर्फ ट्रेलर है, विधानसभा पिक्चर अभी बाकी है’; निलेश लंकेंचा हल्लाबोल

Nilesh Lanke | ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. कुणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नाद करू नका. कारण त्यांचा नाद केला की ते भल्याभल्यांना घरी पाठवत असतात, असा टोला विखे बाप लेकाला लगावून अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाची सभा गाजवली. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे सर्व खासदार उपस्थित होते.

खासदार निलेश लंके म्हणाले की, ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. पवार साहेबांनी चेंडू टाकला आणि समोरच्यांचा त्रिफळा उडाला. नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो, भले भले थकले. आता मुंबईवर झेंडा, तेही बहुमताने फडकणार आहे. विधानसभेवर पवार साहेबांचा झेंडा फडकणार आहे. विधानसभेच्या आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे मी साहेबांना शब्द देतो, बाराचे बारा आणून दाखवतो.

हेही वाचा     –        ‘हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही’; शरद पवारांची मोदींवर टीका 

मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी विकेट काढतो, मी खासदार झालो तेव्हा अनेकांना विचारलं खरंच खासदार झालो का? पण साहेबांमुळे खासदार झालो. तुम्ही मला दिल्लीत नेऊन टाकले. जर संसदेत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर संसद बंद पाडतो, आमचं काम हटके आहे. बघा हे आचारसंहिता आपल्याला कळत नाही. एकदा दिल्लीला जाऊन येतो, अंदाज घेऊन येतो कसा काय ते? निम्मा अंदाज घेऊन आलोय. आपण काम करणारा माणूस आहे. एकच ध्यानात ठेवा, पवार इज पॉवर आहे, असं निलेश लंके म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले की, पवार साहेब एक विचार आहे. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे उभा राहिला. लोकसभेत आपले ८ खासदार निवडून आले. २ उमेदवार जिद्दीने लढले. नकली चोरलेली राष्ट्रवादी त्यांचा स्ट्राईक रेट हा केवळ २५ टक्के आहे. विरोधक केवळ हिंदू मुस्लीम आणि जातीतजातीत तेढ निर्माण करत होते. शरद पवार हे दुष्काळाबद्दल आणि कांद्याबद्दल बोलत होते. पलिकडे गेलेले बोलत होते की, पवार साहेबांनी विश्रांती करावी. येणाऱ्या विधानसभेत साहेब त्यांना विश्राती देतील, भाजपा हद्दपार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button