breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही’; शरद पवारांची मोदींवर टीका

Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या. त्यातल्या पुण्यातल्या सभेत अजित पवार मंचावर असताना नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता. त्यावरुन पंतप्रधान मोदींवर बरीच टीका झाली होती. शरद पवारांनी त्यावेळीही त्यांना उत्तर दिलं होतं. तसंच आता वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही उत्तर दिलं आहे.

शरद पवार म्हणाले की, राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे.

हेही वाचा    –      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 5 माजी मुख्यमंत्री, मिळाली ही महत्त्वाची खाती

मोदींनी शिवसेनाबाबत उल्लेख केला की, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली. त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाचा आत्मविश्वास वाढला. त्यांचा उल्लेख करताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे की, त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, त्यामुळे सत्ता मिळायची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्याप्रकारची त्यांची स्थिती झाली, असं शरद पवार म्हणाले.

खरं सांगायचं तर निलेश लोकसभेत चालल्यावर मला एका गोष्टीची काळजी आहे, आमचे जे जे जुने सभासद संसदेत आहेत ते मला नक्की विचारतील, हा कोण गडी आणला? मी आज तुम्हाला (निलेश लंके) सांगतोय तिथे शुद्ध मराठीतही भाषण करता येतं. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा माईक हातात आला की निलेश लंके मराठीत काय बोलतील याचा भरवसा नाही, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button