breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

PF खात्यातील तपशील अपडेट करण्यासाठी नवी प्रक्रिया

Pension Update : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी खात्यात कर्मचाऱ्याकडून तसेच त्याच्या रोजगारदात्या कंपनीकडून काही योगदान नियमित टाकले जाते. यामुळे या कर्मचाऱ्याचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात ईपीएफ साठत जातो, ज्याचा उपयोग त्याला निवृत्तीपश्चात होतो. या ईपीएफ खात्यांचे संचालन कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना करते. या ईपीएफ खात्यांतील माहिती अद्ययावत करण्यासाठी ईपीएफओने नवी प्रक्रिया आणली आहे.

याद्वारे या अद्ययावतीकरण प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्यात आल्याचा दावा ईपीएफओने केला आहे. नवी प्रक्रिया जाहीर करताना ईपीएफओने स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रसिद्ध केले आहे. या, मध्ये ईपीएफओच्या सदस्य कर्मचाऱ्याला त्याच्या ईपीएफ खात्यासाठी अत्यावश्यक असलेल्या तपशीलात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा – Jawan Trailer : शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर रिलीज

विशेषतः नावाचे स्पेलिंग, वैवाहिक स्थिती, आधार क्रमांकासंदर्भातील माहिती असे बदल करण्याची अनुमती देण्यात आली आहे. यापैकी वैवाहिक स्थिती सोडल्यास बाकीते सर्व बदल फक्त एकदाच करता येणार आहेत. वैवाहिक स्थितीबाबत माहितीत दोनदा बदल करण्याची मुभा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button