breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Jawan Trailer : शाहरूख खानच्या बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर रिलीज

Jawan Trailer : किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या ‘जवान’ सिनेमाचा अखेर ट्रेलर रिलीज झाला आहे. पठाणच्या यशानंतर आता शाहरूख खान जवान या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-रिलीज इवेंट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात या सिनेमातील गाणीदेखील प्रदर्शित करण्यात आली. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

जवळपास २ मिनिटं ४५ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्सचा भरणा पहायला मिळतोय. त्याचसोबत कलाकारांची मोठी फौजसुद्धा यात दिसतेय. यामध्ये शाहरुखसोबत साऊथ स्टार विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा ‘जवान’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये ती काही ॲक्शन सीन्ससुद्धा करताना दिसतेय.

हेही वाचा – धक्कादायक! पत्नीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन मुलाची पतीकडून हत्या

चित्रपटात सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा, प्रियामणी व गिरिजा ओक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याचं संगीत अनिरुद्धने दिलं आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या शुक्रवारपासून भारतात याचं अडवांस बुकिंग सुरू होणार आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button