breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

नवनीत राणा अरविंद सावंतांविरुद्ध गुन्हा दाखल करणार

नवी दिल्ली – राज्यात पोलीस अधिकारी परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांनी वातावरण तापलेलं असतानाच खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावला. परंतु आता नवनीत राणा आक्रमक झाल्या असून सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्या म्हणतात, ‘महाराष्ट्रात सुरू असलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, तसेच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरून ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. ‘तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात त्यांनी मला धमकावले. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे’, असे राणा यांनी म्हटले होते.

तर दुसरीकडे अरविंद सावंत यांनी म्हटले की, ‘हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण त्यांना धमकावलं हे साफ खोटं आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर बघितलं, तर जेव्हा केव्हा त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलं नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेन का?’, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button