Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#War Against Corona: मुंबईमध्ये दिवसभरात 183 नवीन रुग्ण; आजवर 113 जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-10.jpg)
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
महाराष्ट्रात मुंबई हा कोरोना विषाणुचा ‘हॉटस्पॉट’झाला आहे. राज्याची राजधानी आणि संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोराणा विषाणुचा प्रादुर्भात तीव्र झाल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.
बुधवारी एकाच दिवसात मुंबईमध्ये 183 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. तसेच, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर मुंबईमध्ये एकूण 1936 कोरणाबाधित रुग्ण आहेत. तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृह्मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.