ताज्या घडामोडीमुंबई

वाशीतील एपीएमसी धान्य बाजारात खड्यांचे साम्राज्य

अंतर्गत भागात पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे

नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी धान्य बाजारात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज हजारो मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे निर्माण होत आहेत. काही वर्षांपूर्वी १९ कोटी रुपये खर्च करून धान्य बाजारातील रस्त्यांचे काँक्रीटकरण करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणचे खड्डे बूजवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे बाजारात येणाऱ्या वाहतूक चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

धान्य बाजाराच्या एकूण १६.२९ हेक्टर परिसरात ४१२ गाळे आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते. बाजारातील अंतर्गत भागात बहुतांशी रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन कराव लागत आहे. एपीएमसी बाजारात अवजड वाहनांमुळे येथील डांबरी रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत असल्याने बाजार समितीने येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला मात्र या पाच मार्केट मधील भाजी मार्केट व फळ मार्केट मधील जवळपास सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तर कांदा बटाटा बाजारात काही भाग व मसाला आणि धान्य बाजारातील मुख्य रस्ता वगळला इतर रस्ते आज ही डांबरीकरणाचे आहेत. या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. एपीएमसी प्रशासकीय कालावधीत धान्य बाजारातील अंतर्गत रस्त्यांचे काम करण्यासाठी २३ कोटींची तरदूत करून ठेकेदारामार्फत काम करण्यात आले होते. १९ कोटी रुपये खर्च करून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटकरण करण्यात आले होते. त्यावेळी हे कंत्राट मध्येच रद्द करण्यात आला होता. त्यामुळे काही भागांचे काम रखडले होते ते आजतागायत रेंगाळले आहे.
एपीएमसी धान्य बाजारातील पावसाळापूर्वी सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. तरी देखील आता कुठे खड्डे पडले असतील तर त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button