breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर आज लसीकरण बंद

मुंबई – लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. त्याचनुसार, मुंबईतही आज पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकसरण बंद राहणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आज बाहेर पडू नका, असं मुंबई महापालिकेने आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरून, ‘मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (३ जून, २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.’ असं ट्विट करण्यात आलं आहे.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु आज लसीकरण बंद असल्याने या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. परदेशातील काही विद्यापीठांनी लसीकरण बंधनकारक केलं आहे. तर काही विद्यापीठ ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नसेल तर त्यांच्यासाठी परदेशात लसीकरण करत आहेत.

याआधीही मुंबईत लसीकरण बंद ठेवण्याचा किंवा मर्यादित लसीकरण केंद्र सुरु आणि इतर लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये यासाठी मुंबई मनपाने नागरिकांना 2 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास ट्वीट करुन लसीकरण केंद्र बंद ठेवणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान शहरातील लसीकरण आज बंद का ठेवलं याचं कारण महापालिकेने ट्वीटमध्ये दिलेलं नाही. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे आज महापालिका आणि शासकीय केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याचं कळतं. मिळालेल्या माहितीनुसार लसीचा पुरवठा आजच होईल परंतु उद्या लसीकरण सुरु होईल, अशी शक्यता आहे.

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु आज लसीकरण बंद असल्याने या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे. परदेशातील काही विद्यापीठांनी लसीकरण बंधनकारक केलं आहे. तर काही विद्यापीठ ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतली नसेल तर त्यांच्यासाठी परदेशात लसीकरण करत आहेत.

याआधीही मुंबईत लसीकरण बंद ठेवण्याचा किंवा मर्यादित लसीकरण केंद्र सुरु आणि इतर लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये यासाठी मुंबई मनपाने नागरिकांना 2 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास ट्वीट करुन लसीकरण केंद्र बंद ठेवणार असल्याचं सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button