ताज्या घडामोडीमुंबई
ठाणे ; चार मित्र प्रवास करत असलेल्या कारचा धडकेनंतर चेंदामेंदा
![Thane; Four friends collided head-on with a traveling car](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Thane-Accident.jpg)
ठाणे, मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा भागात रविवारी सकाळी एका भरधाव कारची पथदिव्याला धडक बसली. या घटनेत कारमधील इजलाल खान (१८) , असद खान (१७), ताहीर खान (२१) अरहम खान (१८) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अरहम हा ठाण्यातील हाजुरी येथून त्याच्या कारने नाशिकच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत असद, ताहीर आणि इजलाल हे तिघे होते. कार माजीवडा परिसरात आली असता अरहमचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार येथील एका पथदिव्याला धडकली. या घटनेत चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कार भरधाव होती अशी माहिती पोलिसांनी दिली.