TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

केईएममध्ये मिरगीच्या ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

मिरगी येणे म्हणजेच फिट येण्याचा त्रास अनेकांना असतो. मिरगी येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असले तरी ती अचानक येत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात मिरगीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते. केईएममध्ये आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर यापैकी २५० जणांचे आयुष्य पूर्णत: बदलले असून, ते आनंदी आयुष्य जगत आहेत.

अनेकदा लहान मुलांना तीव्र ताप आल्यावर किंवा मेंदूमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाल्यास मिरगीचा त्रास सुरू होतो. मिरगी अचानक येत असल्याने अनेकदा ती नागरिकांच्या जीवावर बेतते. त्यामुळे मिरगीपासून सुटका व्हावी यासाठी नागरिकांचे प्रयत्न असतात. अनेकांना औषधाेपचाराने मिरगीचा त्रास नियंत्रणात आणणे शक्य असते. मात्र २० ते २५ टक्के नागरिकांना होणारा त्रास हा औषधानेही बरा होत नाही. अशावेळी त्यांची व्हिडिओ ईईजी, एमआरआय, पेट स्कॅन, न्युरो सायकोलॉजी यांच्या माध्यमातून तपसाणी करण्यात येते. या तपासणीमध्ये मेंदूचा नेमका कोणता भाग ग्रस्त झाला आहे, शस्त्रक्रियेद्वारे तो कमी करता येऊ शकतो हे स्पष्ट होते. ही तपासणी केल्यानंतरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येतो. त्यानुसार केईएम रुग्णालयात आतापर्यंत ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये लहान बालकांपासून मोठ्या रुग्णांचा, तसेच १८ वर्षांवरील ५४० रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मागील १० वर्षांतील रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा सध्या रुग्णालयाकडून घेण्यात येत आहे. यामध्ये २५० नागरिकांनी मिरगी संदर्भात केलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य आनंदी झाले असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. संपूर्ण राज्यामध्ये फक्त केईएम रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते. मिरगीसंदभार्तील शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या या शस्त्रक्रियेत महत्त्वाची असलेल्या व्हिडिओ ईईजी विभागाचे नूतनीकरण केईएम रुग्णालयात करण्यात आले. त्याचे उद््घाटन गुरूवारी करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button