breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत कडक निर्बंध लावणार- पालकमंत्री अस्लम शेख
![Strict restrictions will be imposed in Mumbai: Guardian Minister Aslam Sheikh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Aslam-Shaikh-mumbai.jpg)
मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतही कोरोना प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. मंगळवारची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 1 हजार 922 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. असं असलं तरी मुंबईतील स्थिती बिकट नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलंय. पण कठोर निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेतही शेख यांनी दिले आहेत.
अस्लम शेख यांनी आज मालाडमधील तुंगा हॉस्पिटलला भेट दिली. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लसीकरणाबाबत अजूनही थोडे संभ्रम आहेत. आपण लसीकरणाबाबत घाबरुन न जाता डॉक्टरांना योग्य प्रतिसाद देण्याची गरज असल्याचं शेख म्हणाले. तसंच लसीकरणाचा कार्यक्रम योग्य पद्धतीनं सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.