राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती देत, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचे व चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सलग २५ हजारांवर नव्या बाधितांची नोंद होत आहे. या स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक लक्ष ठेवून आहेत. सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात आहे. त्यातच त्यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झालेले आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य आहेत. ‘सौम्य लक्षणे जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. तसेच ‘नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची कुचराई करू नये. कोविड नियमांचे पालन करा आणि सुरक्षित राहा’, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे.
On having mild symptoms of COVID, I had myself tested and I am COVID positive. I request everyone who came in contact with me to get themselves tested.
I urge everyone to realise that it is extremely important to not let your guard down. Please follow COVID protocols & stay safe
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021