ताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

सहकलाकार चंद्रकांत यानं आयुष्य संपवलं

मुंबई : तेलुगू अभिनेता चंद्रकांत याचं निधन झालं आहे. तेलंगाना इथल्या अलकापुरमधली राहत्या घरी त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सहकलाकार आणि चांगली मैत्रिण असलेल्या पवित्रा हिच्या अपघाती निधनाचा धक्का सहन न झाल्यानं त्यानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

चंद्रकांतची जवळची मैत्रिण तेलुगू व कन्नड अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झालं. तिच्या निधनाचा चंद्रकांतला मोठा धक्का बसला. राहत्या घरी त्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनं दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली असून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अपघातात पवित्राचं निधन
पवित्रा आणि चंद्राकांत कारमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला. हैदराबादजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कारमध्ये या दोघांशिवाय पवित्राची बहीण अपेक्षा तसंच त्यांचा ड्रायव्हरही होते. मात्र पवित्राचं अपघातात निधन झालं, तर इतर जखमी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काळापासून चंद्रकात आणि पवित्रा अलकापूर इथल्या घरात एकत्र राहत होते. याच घरात चंद्रकांतनं आयुष्य संपवलं. पवित्राच्या निधनाचा चंद्रकांतला जबर धक्का बसला होता. पवित्रा आणि चंद्रकात हे दोघेही ही कन्नड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे होते.

ती पोस्ट
चंद्राकात यानं तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पवित्रासोबतचा फोटोंचा एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यावर त्यानं लिहिलं होतं की, ‘आणखी दोन दिवस वाट पाहा प्लीज’. चंद्रकांत आणि पवित्रा खरं तर फक्त मित्र नव्हते, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रकांतनं दोघांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. आम्ही दोघेही लवकरच नात्याबद्दल सगळ्यांना सांगू…असं तो म्हणाला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच काही तरी होतं. दोघांचंही निधन झालं आणि त्यांची कहाणी अधुरीच राहिली.

दरम्यान, पवित्रा आणि चंद्रकांत यांच्या निधनानंतर साऊथ सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि श्रद्धांजली वाहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button