breaking-newsताज्या घडामोडीमुंबईविदर्भ

व्हॅाट्सॲपच्या ॲडमीनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई– सोशल मीडियावर अनेक चांगल्या वाईट गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातच काही समाजविघातक तर काही आक्षेपार्ह मेसेजेस व्हाट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी यापूर्वी व्हाट्सॲप ॲडमिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच असे प्रकार घडल्यास ॲडमिनला दोषी धरण्यात येत होतं.

दरम्यान, या सर्व प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 2016 च्या एका प्रकरणात ग्रुपमधील महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी आरोपीसह व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिनलाही जबाबदार धरण्यात आलं होतं.

जुलै 2016 मधील गोंदिया जिल्ह्यातील प्रकरणात ग्रुप ॲडमिनसह असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्ती विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती झेड.ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी ग्रुप ॲडमिनचा गुन्हा रद्द ठरवून त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

ग्रुपमधील सदस्यांच्या मताशी ग्रुप ॲडमिनचा कुठलाही संबंध दिसत नसल्यामुळे आणि एखाद्याच्या वैयक्तिक मेसेजला व्हाट्सॲप ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. याप्रकरणात नागपूर खंडपीठाने व्हाट्सॲप ग्रुप ॲडमीनला मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे. व्हाट्सॲप ग्रुप संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button