Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
शिवसेनेच्या धमकीला भीक घालत नाही; नारायण राणेंचं प्रत्युत्तर
![Shiv Sena's threat does not beg; Narayan Rane's reply](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/03/Narayan_Rane.jpg)
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणे यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. गुन्हा का दाखल झाला माहिती नाही. कसलाही गुन्हा केलेला नाही. अटक करायला मी काय नॉर्मल माणूस आहे काय? कोण शिवसेना? शिवसेनेला मी भीक घालत नाही. शिवसेना आक्रमक असेल तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आहोत. समोर येऊन दाखवावं. त्यांची राज्यात सत्ता असली, तर आम्ही केंद्रात सत्तेत आहोत. पाहू कुणाची उडी किती आहे, असं प्रत्युत्तर नारायण राणेंनी दिलंय.