गौतम अदानीला मोठा हादरा आयपीओला सेबीची मनाई
![SEBI denies IPO to Gautam Adani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Gautam-Adani_0-4.jpg)
मुंबई – अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना आज सेबीने मोठा हादरा दिला. त्यांच्या समूहातील अदानी विल्मर लिमिटेडच्या आयपीओला मनाई केली. अदानी समूहाची चौकशी सुरू असल्यामुळे सेबीने आयपीओला बंदी घातली आहे.
भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीने आयपीओ काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी सेबीकडे रीतसर अर्ज केला होता. परंतु सेबीने त्यांना आयपीओ काढण्यास बंदी घातली आहे. सर्वसाधारणपणे सेबीने परवानगी दिल्यावर खुल्या बाजारातून आयपीओच्या मदतीने कंपन्यांना भाग भांडवल उभारता येते. मात्र सेबीने अदानी विल्मरला बंदी घातल्यामुळे हा गौतम अदानी यांना हादरा समजला जातो. अदानी समूहातील काही कंपन्यांची चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारने ही माहिती संसदेत दिली होती. अदानी समूहाच्या कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याविषयी त्यांची चौकशी सुरू आहे. म्हणून या आयपीओला सेबीने मनाई केली आहे. अदानी विल्मर लिमिटेड आयपीओतून ४,५०० कोटी जमा करणार आहे. ही कंपनी खाद्यतेलाची विक्री करते.