TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई – ठाण्यात संततधार ; सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात , लोकल संथगतीने सुरू

मुंबई – ठाणे परिसरात गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने आजही उसंत घेतलेली नाही. मुंबईतील सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. लोकल सेवा संथगतीने सुरू आहे.हवामान विभागाने शुक्रवार (१६ सप्टेंबर) आणि शनिवारी (१७ सप्टेंबर) मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावासाने हजेरी लावली आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारी पाहाटेपासून वाढला आहे.दरम्यान, सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कुलाबा केंद्रात ३१.४ मि.मी., तर सांताक्रुझ केंद्रात ३९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

लोकल विलंबाने

मुंबई आणि आसपासच्या परिसरात शुक्रवार सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण, कसारा, खोपोली मार्गावरील लोकल, सीएसएमटी-पनवेल आणि गोरेगाव हार्बर, तसेच ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर आणि चर्चगेट-विरार दरम्यानच्या लोकल विलंबाने धावत आहेत. साधारण दहा मिनिटे विलंबाने लोकल धावत असून लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली पट्ट्यात मुसळधार पावसामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे मोटरमनला लोकल चालविताना समस्या येत असून त्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. लोकल सेवा विस्कळीत नसून सुरळीत सुरू असल्याो मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात दुपारी १ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (गेल्या २४ तासांत) पडलेला पाऊस
विलेपार्ले ५१.५ मिमी
चेंबूर ५६.५ मिमी
भायखळा ४८.५ मिमी
विद्याविहार ४५ मिमी
सांताक्रूझ ३९.५ मिमी
कुलाबा ३१.४ मिमी

मुंबई विमानतळ २१ मिमी

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील पाऊस
उल्हासनगर ८८ मिमी
शहापूर १३४ मिमी
मुरबाड ९३ मिमी
भिवंडी ७६ मिमी
अंबरनाथ ७५ मिमी
कल्याण ७६ मिमी

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button