TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

लाव रे तो व्हिडीओ; मग ते शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना;

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

मुंबई । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. सुषमा अंधारेंच्या या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला आहे. यात्रेदरम्यान हे नेते आक्रमक भाषण करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे भाषणा चांगलंच गाजतंय.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. सुषमा अंधारेंच्या या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला आहे. यात्रेदरम्यान हे नेते आक्रमक भाषण करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे भाषणा चांगलंच गाजतंय. तसेच, ते भाषणातून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर तसेच, भाजपावर टीका करताना पाहायला मिळतंय. नुकताच महाप्रबोधन यात्रेत लाव रे तो व्हिडिओ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडिओ उपस्थितांसमोर झळकावला आणि हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना? असा खोचक सवाल उपस्थित केला. त्यामुळे सुषमा अंधारेंच्या या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘एका सभेत भाषण करताना एकनाथ शिंदें थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यावेळी, भाजपकडून होणाऱ्या अन्यायावर त्यांनी भाष्य केलं होतं. तसेच, मी अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. मी एक शिवसैनिक आहे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या याच भाषणाचा व्हिडीओ उपस्थितांना दाखवला. त्यानंतर “हे दादा कोण आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जुळे भाऊ तर नाहीत ना?” असा खोचक सवाल उपस्थित केला होता.

याच भाषणात सुषमा अंधारे यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला. “गुलाबराव पाटीलांनी ५० वेळा सांगितलं की, मी पानटपरीवाला होतो. मी पानटपरीवाला होतो, मी टपरी चालवत होतो. मला मातोश्री आणि बाळासाहेबांनी मोठं केलं. टपरीवाल्यांना एवढ्या मोठ्या मंत्रीपदावर बसवलं. मग, टपरीवाले दादा अशी का टपरी भाषा करता तुम्ही. टपरीवाल्या दादांबद्दल मला आदर आहे. पण, त्यांची भाषा जेव्हा बिघडते, तेव्हा त्यांना काय सांगायचं समजावून”, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. शिवाय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button