TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ प्रकाशनाच्या मार्गावर; तीन कालखंडांतील साडेपाचशे साहित्यिकांची नोंद

मुंबई : दलित वा फुले-आंबेडकरी साहित्य चळवळीतील लेखक-कवींच्या योगदानाची नोंद घेणारा महत्त्वाकांक्षी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या वाङ्मयकोशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडांतील साडेपाचशे साहित्यिकांच्या कामगिरीची दखल घेण्यात आल्याची माहिती प्रकल्पप्रमुख आणि मुख्य संपादक डॉ. महेंद्र भवरे यांनी दिली. 

सन १९५६ नंतर उदयास आलेल्या दलित साहित्य चळवळीला सहा दशकांहून अधिक कालखंड झाला आहे. या चळवळीतील लेखक-कवींच्या लेखनाची, योगदानाची यथोचित दखल घेऊन हा इतिहास दस्तऐवज म्हणून अभ्यासकांना उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक होते, असे डॉ. भवरे यांनी सांगितले. ए-फोर आकाराचा आणि एक हजारपेक्षाही अधिक पृष्ठसंख्येचा हा वाङ्मयकोश आता सिद्ध झाला आहे. गेली पाच वर्षे या प्रकल्पाचे काम सुरू होते. 

या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. भवरे म्हणाले की, एकोणिसाव्या शतकात म. फुले यांनी व विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचे आंदोलन सुरू केले. बाबासाहेबांची चळवळ, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, त्यातून प्रसिद्ध झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते आणि दलित साहित्याचा विकास हा या देशातील ऐतिहासिक दस्तऐवज आहे. वाङ्मयीन चळवळीचा एक अविभाज्य भाग म्हणून या कोशाची निर्मिती करण्यात आली आहे.

वैशिष्टय़े..

ल्लडॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर साहित्यिकांच्या योगदानाची दखल.

ल्लसाडेपाचशेहून अधिक लेखक-कवींचा समावेश.

ल्लप्रकल्पावर पाच वर्षे काम, एक हजारपेक्षाही अधिक पृष्ठसंख्या.

पाच वर्षांची मेहनत..

वाङ्मयकोशाच्या सिद्धतेसाठी गेल्या पाच वर्षांपासून डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. मनोहर जाधव, अर्जुन डांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य संपादक डॉ. महेंद्र भवरेंसह राम दोतोंडे, डॉ. अशोक इंगळे, डॉ. सुनील अवचार, डॉ. मच्छिन्द्र चोरमारे, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. प्रकाश मोगले, पंडित कांबळे, डॉ. भास्कर पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांचे संपादक मंडळ काम करीत होते.

दलित साहित्याचा विकास हा या देशातील महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तो इतिहासाचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य वाचकांना एकत्रितपणे उपलब्ध व्हावा, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

– डॉ. महेंद्र भवरे, मुख्य संपादक, फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button