TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘शिवतीर्थ’वर महायुतीचे पडघम, श्रीकांत शिंदे पाया पडले

मुंबई : शिंदे गट-मनसे आणि भाजप यांच्यातील महायुतीची घोषणा ही केवळ औपचारिकता राहिलेय की काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसात घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा हा महायुतीची नांदी मानला गेला. त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे मनसे आमदार राजू पाटील आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यातील दिलजमाई होताना दिसली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र – खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर हजेरी लावली.

राज यांच्या घरी आले. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात असलं, तरी शिंदेंनी लेकाला कुठला निरोप घेऊन ‘राज’ दरबारी पाठवलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे मनसे-शिंदे गट यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.

श्रीकांत शिंदे हे सपत्नीक शिवतीर्थावर आले होते. त्यांच्यासोबत शिंदे गटातील नेते नरेश म्हस्केही होते. विशेष म्हणजे निरोप देण्यासाठी राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह शिवतीर्थाच्या दारापर्यंत आले होते. दरवाजात श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी राज ठाकरेंच्या पायाही पडले. त्यानंतर कारमध्ये बसल्यानंतर राज ठाकरेंनी सर्वांना टाटा केला आणि मगच ते वळले. मात्र यावेळी दोघांमध्ये कुठली राजकीय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button