ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील पहीली भूयारी रेल्वे लवकरच सुरु

कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा

मुंबई : मुंबईतील पहीली भूयारी रेल्वे लवकरच सुरु होत आहे. कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी अशा भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा येत्या 24 जुलै रोजी सुरु होणार असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी ट्वीट केले आहे. एक्स माध्यमावर विनोद तावडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ही आनंदाची बातमी मुंबईकरांसाठी दिली आहे. या त्यांच्या एक्स (आधीचे ट्वीटर ) अकाऊंटवर मुंबईची पहीली भूमिगत मेट्रो ( (Aqua Line ) 24 जुलै पासून सुरु होत आहे. या शहराच्या वेगाला या मेट्रोमुळे नवा आयाम मिळणार असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील मेट्रो – 3 हा कुलाबा – बीकेसी – सिप्झ असा 33 किमीचा भूयारी मार्ग आहे. या मेट्रोचा पहिला बीकेसी ते आरे असा टप्पा तयार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 जुलै रोजी होत आहे.

मुंबई मेट्रो तीनची आरडीएसओची ट्रायल 24 जून रोजी पार पडली होती. या मेट्रोचा बीकेसी ते आरे कॉलनीचा पहिला टप्पा आता प्रवाशांच्यासाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो तीनचा मार्गिकेसाठी आरे कॉलनीतील कारशेडचा मुद्दा चांगलाच वादात सापडला होता. या पर्यावरणवादी तसेच कोर्टात प्रकरण गेल्यानंतर आणि कोरोना साथ या अनेक अडचणींमुळे कारशेड उभारण्यासाठी बराच वेळ खर्ची पडला. त्यामुळे इतक्या संकटातून मुंबईची मेट्रो तीन हा भूयारी मेट्रोचा पर्याय मुंबईकरांना आता मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत रेल्वे आणि मेट्रोशी कनेक्टेट नसलेला भाग प्रथमच मेट्रो मार्गिकांशी जुळला जाणार आहे. भूयारी मार्गिकेत एकूण 27 स्थानके आहेत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button