breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

MNS Impact : नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत

नवी मुंबई | मनसेने आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलांनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली जादा आकारलेल्या बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 32 लाख रुपये हॉस्पिटलने परत केल्याचे समोर आले आहे.

पी. के. सी हॉस्पिटल (वाशी), एम. पी. सी. टी हॉस्पिटल (सानपाडा), एम. जी. एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिस हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटलांनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे एकूण 32 लाख रुपये आतापर्यंत परत केले.

याबाबत महापालिकेने मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तसेच कोव्हिड काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या संपूर्ण बिलांची पडताळणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करुन जादा आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 022-2756 73 89 हा हेल्पलाईन नंबर तसेच 720 849 0010 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button