TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराष्ट्रिय

श्री. म्हसोबा देवस्थान मित्र मंडळ बरखास्तीची घोषणा

ठाणे ः
गेल्या अनेक वर्षांपूर्वी सामाजिक कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले ओवळे गावातील श्री.म्हसोबा देवस्थान मित्र मंडळ हे अखेर बरखास्त करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काही कारणास्तव तसेच काही लोकांची इच्छा होती की हे मंडळ बंद करण्यात यावे. त्यामुळे हे मंडळ दि.15 मे 2023 पासून बंद करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संस्थापक शिवभक्त-अजित शिंदे यांनी ‘महाईन्यूज’ला दिली.

यावेळी अजित शिंदे म्हणाले की, आजपर्यत मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य, उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच आज मंडळ जरी बंद केले असले, तरी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जे सामाजिक कार्य चालू होते. ते इथून पुढेही मी स्वःत सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेन.

यावेळी शिंदे यांनी मंडळातील सर्व सदस्य, मान्यवर व पदाधिकारी यांचे आतापर्यंत साथ दिल्याबद्दल आभार मानले. यापुढे मंडळाच्या नावाचा, व कोणत्याही पदाचा उल्लेख मंडळातील कोणालाही करता येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले व कोणीही मंडळाच्या नावाचा गैरवापर करू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button