ताज्या घडामोडीमुंबई

आता व्हॉट्सअॅपवर मिळणार मेट्रोचे तिकीट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 मुंबई | प्रतिनिधी

घाटकोपर ते वर्सोवा या ‘मेट्रो १’ने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपद्वारे ई-तिकीट वितरित करण्याची प्रणाली सुरू केली आहे. यामागे कागदी तिकिटांचा वापर कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मेट्रो-१ प्रशासनाने यापूर्वीच पेपर क्यूआर तिकीट प्रणाली आणली. मात्र ८० टक्के प्रवासी अद्याप रोख पैसे देऊन तिकीट खरेदी करण्याचा पर्याय निवडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोखीने तिकीट खरेदीची इच्छा असलेल्या नागरिकांना ऑनलाइन प्रणालीकडे वळविण्यासाठी मेट्रो-१ प्रशासनाने व्हॉट्सॲपद्वारे ई-तिकीट देण्याची प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये प्रवाशांनी मुंबई मेट्रो प्रशासनाच्या क्रमांकावर इंग्रजीत ‘हाय’ असे टाइप करून पाठवताच त्यांना ओटीपी क्रमांक व्हॉटसॲपद्वारे मिळणार आहे. तिकीट खिडकीवर हा ओटीपी क्रमांक सांगून रोख पैसे देताच व्हॉट्सॲपवर ई-तिकीट येणार आहे. हे तिकीट स्कॅन केल्यावर स्थानकात प्रवेश मिळेल.

जगभरात पहिल्यांदाच व्हॉट्सॲपद्वारे ई-तिकीट देण्यास सुरुवात केली जाणार आहे, असा दावा मुंबई मेट्रो-१ प्रशासनाने केला. तसेच आगामी काळात पैशांचा ऑनलाइन भरणा करून व्हॉट्सॲपद्वारे ई-तिकीट देण्याचा पर्यायही प्रशासनाकडून दिला जाणार आहे. सध्या प्रति कागदी तिकिटासाठी ९ पैसे इतका खर्च येतो. ई-तिकीट प्रणालीमुळे या खर्चात बचत होणार आहे. पर्यावरण संवर्धन होण्यास मदत मिळणार आहे, असेही ‘मेट्रो-१’च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. व्हॉट्सॲप तिकिटासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘मेट्रो-१’ची प्रवासीसंख्या २.६ लाखांवर.

करोना साथीनंतर घटलेली ‘मेट्रो-१’ची प्रवासीसंख्या २ लाख ६० हजारांपर्यंत पोहोचली आहे. प्रवासीसंख्येत वाढ होत असून लवकरच ती करोनापूर्व काळातील संख्येपर्यंत पोहोचेल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button