ताज्या घडामोडीमुंबई

मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आपली शाळा -आपलं लेकरु सुरक्षा अभियान

महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षक व पालक संघटना शालेय विद्यार्थी-पालक यांना भेडसाणाऱ्या समस्यांची तक्रार निर्भिडपणे करण्याचे आवाहन

मुंबईः मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आपली शाळा -आपलं लेकरु सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या असोसिएशनतर्फे महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षक व पालक संघटना शालेय विद्यार्थी-पालक यांना भेडसाणाऱ्या समस्यांची तक्रार निर्भिडपणे करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षक व पालक संघटनांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने संस्थापक अध्यक्षा शीतल करदेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. ‘बदलापूर बालिका अत्याचार’ घटनेच्या पार्श्वभूमीवर हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.

आपल्या सर्वांचे सहकार्य व सजगता या विषयात अपेक्षित आहे. जेणेकरून पुढे कोणत्याही लेकीवर अथवा लेकावर अन्याय होणार नाही. गुन्हेगार गुन्हे करायला घाबरतील आणि संस्थाचालक आपल्या संस्था काटेकोरपणे चालवतील! आपल्या माहिती नंतर आम्ही प्रत्यक्ष शाळांना भेटही देऊ ! बेजबादार शाळा ,संस्थांचा नगारा माध्यमातून वाजवू, असे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

आपली शाळा -आपलं लेकरु सुरक्षा अभियानातील महत्त्वाचे मुद्दे
विद्यार्थ्यांच्या अडचणी तक्रारीबाबत शाळा संस्थापक सहकार्य करतात का ?*
शाळेमध्ये स्वच्छतागृह आणि इतर सुरक्षेच्या व्यवस्था योग्य प्रकारे आहेत का?
तसेच शाळेत विद्यार्थी येण्या जाण्यासाठी असणाऱ्या गाड्यांची सुरक्षा आणि त्या स्कूलबसमध्ये मुलींसाठी असणाऱ्या सेविका यांची नियोजन योग्य प्रकारे असते का?
याची माहिती आम्हाला पुढील नंबर वर व ईमेलवर द्यावी जेणेकरून आम्ही या सरकारी शाळा तसेच खाजगी शाळा सरकारी मंंजुरी सहाय्यता आणि सवलतीच्या जागांवर आपल्या शाळा चालवतात मोठ्या फि आकारतात,त्या शासनाने काढलेल्या जीआर नुसार त्या नियमावलीचे पालन करतात का ? याविषयीची तक्रार अनेकदा झाली तरी शाळा आणि शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने हे विषय दाबले जातात!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button