ताज्या घडामोडीमुंबई

माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्ण संधी!

भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि अधिक माहिती.

थेट माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. माझगाव डॉककडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आठवी पास आणि दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तब्बल 518 पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. 2 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन, पाईप फिटर, फिटर, वेल्डर, कारपेंटर, रिगर, पाईप फिटर, वेल्डर, पाईप फिटर , COPA, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, फिटर स्ट्रक्चरल अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 50 टक्के मार्कासह दहावी पास केलेली असावी. तसेच 50 टक्के मार्कासह आयटीआय पास केलेला असावा. आठवीमध्ये 50 टक्के गुण मिळालेले उमेदवाराही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 21 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

https://mazagondock.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत हे अगोदर तपासा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button