breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वसईत साष्टीकरपाडा येथे परफ्यूम कारखान्याला भीषण आग

मुंबई |

वसई पूर्वेच्या पोमण जवळील साष्टीकरपाडा येथे परफ्यूम तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात माल जवळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वसई पूर्वेतील भागात पोमण ग्रामपंचायत हद्दीतील साष्टीकरपाडा परिसर आहे. या भागात परफ्यूम तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्याला गुरुवारी सकाळी अचानकपणे आग लागल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन अग्निबंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कारखान्या परफ्यूम च्या बाटल्या असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली आहे. दोन ते अडीच तासाहून अधिककाळ उलटून गेला तरी आग अजूनही आटोक्यात आली नाही. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अजूनही कळू शकले नाही. वालीव पोलीस ही घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने आजूबाजूला राहत असलेल्या नागरिकांना बाजूला करण्याचे काम करीत आहेत. लागलेल्या आगीच्या घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यांना नियंत्रित करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button