breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमुंबई

LPG गॅस सलग दुसऱ्यांदा स्वस्त, पहा तुमच्या शहरातील नवे दर?

मुंबई : घरगुती गॅस सिलिंडरवरील दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसघरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात केल्यानंतर आज १ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला आहे.

अशा प्रकारे सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत दोन महिन्यांत २५१ रुपयांनी कमी झाली आहे, जी जुलैमध्ये १७३३ रुपये होती. १९ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. वृत्तानुसार, आजपासून १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर १५७ रुपयांनी कमी दराने उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा – केंद्र सरकार विचलीत झाल्याने ‘एक देश, एक निवडणूक’; काँग्रेसचा हल्लाबोल!

नवीन दरानंतर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १४८२ रुपये झाली आहे, जी पूर्वी १६६०.५० रुपये होती. अशा परिस्थितीत आता रेस्टॉरंट मालकांना तसेच मिठाई बनवणाऱ्यांना सणासुदीच्या काळात दर कपातीचा सर्वाधिक फायदा होईल. गॅसच्या किंमती कमी झाल्यामुळे वस्तूंच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे.

मेट्रो शहरात व्यावसायिक LPG गॅसचे नवीन दर

  • दिल्ली : १५२२.५० रुपये
  • कोलकाता : १६३६ रुपये
  • मुंबई : १४८२ रुपये
  • चेन्नई : १६९५ रुपये
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button