ताज्या घडामोडीमुंबई
चलो दापोली मार्च; अनिल परबांसाठी किरीट सोमय्यांचा नारा
![Let's march Dapoli; Slogan of Kirit Somaiya for Anil Parbhan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/kirit-somaiya-1.png)
मुंबई | शनिवारी २६ मार्चला आम्ही ‘दापोली मार्च’ आयोजित केला आहे. मुंबई येथून सकाळी ७ वाजता निघणारा हा ‘चलो दापोली मार्च’ अनिल परबांचे दापोलीतील बेकायदा रिसॉर्ट पाडण्यासाठी आयोजित केला आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल परब यांनी दापोलीत रिसॉर्ट बांधले आहे. भ्रष्टाचाराच्या पैशातून बांधलेले हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे माफिया सरकार हे रिसॉर्ट तोडत नाही. त्यामुळे ते तोडण्यासाठी आम्ही ‘दापोली मार्च’ काढणार आहोत. शनिवारी २६ मार्चला ‘चलो दापोली’ असा नारा देत आम्ही रिसॉर्ट पाडण्यासाठी हे जनआंदोलन करत आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे आता अनिल परब यांच्या विरोधात सोमय्या अधिक आक्रमक आणि सक्रीय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे